Type Here to Get Search Results !

अभिषेक शिंदेने जिद्दीच्या बळावर मिळवले यश

 अभिषेक शिंदेने जिद्दीच्या बळावर मिळवले यश

एकाच वेळी ३ ठिकाणी पोलिस भरती

धाराशिव स्टार न्युज:-

धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी गावाच्या अभिषेक श्रीराम शिंदे या तरुणाने परिस्थीतीवर मात करत एकाच वेळी 3 ठिकाणी पोलिस भरतीत यश मिळवले आहे.

चोराखळी ता.कळंब जि.धाराशिव येथील शेतकरी श्रीराम सुब्राव शिंदे यांचा मुलगा अभिषेक १० वी झाल्यानंतर पुण्याला गेला.डिझेल मेकॅनिकला प्रवेश घेतले.एक वर्षाचे शिक्षण झाले.नोकरीच्या शोधात तो फिरला परंतु नोकरी मिळाली नाही.१२ वी शिक्षण पुर्ण केले.पोलिस भरतीची तयारी केली.पहिल्या वर्षी  यश मिळाले नाही. ६ मार्कने पोस्ट गेली.

परत जिद्द कायम परत ग्राउंड आणि लेखी परिक्षेची तयारी चालू केली. अभिषेक आणि त्याचा मित्र कॉलेजला जात असताना अचानक अपघात झाला. अभिषेकला  खूप मार लागला , अक्षरशः तो अपघात एवढा भयानक होता की त्यामध्ये अभिषेकच्या हाता पायाला दुखापत  झाली.दोन महिने एकाच जाग्यावर काढले.पोलिस भरतीची तयारी करत असताना.घटना घडली.तो हताश झाला.परंतु तो जिद्दीने पेटला होता.त्याने पुन्हा तयारी केली.परिक्षा दिली.एक मार्काने संधी हुकली.तरी सुद्धा त्याने निराश न होता जिद्द कायम ठेऊन परत तयारी चालू केली. परत अभ्यास आणि ग्राउंड चालू केले . धाराशिवला तो राहत होता .आर एस अकॅडमी मध्ये  (राहुल शिरसाट, ग्राउंड शिक्षक विशाल मर्दांडे (वस्ताद)अमोल चव्हाण (वस्ताद)सोबत,स्वतः अभ्यास करून तयरी चालू केली, आईचे खूप कष्ट होते बिचारी सकाळी ५ वाजता उठून त्याचा डब्बा तयार करून देत असे, आणि दिवसभर किती काम असलं तरी रात्री उशीर झाला तरी सकाळी लवकर उठून त्याचा डब्बा करून देत असे.आपला मुलगा पोलिस व्हावा असे आईला वाटत होते.

अभिषेक हा पहिल्यापासून हट्टी होता. त्याने जर एखादी गोष्ट मनात ठरवली की तो पूर्ण करीत होता.

या प्रवासामध्ये त्याला खूप टोमणे पण भेटले की तू हे करू शकत नाही ,करू नको एखादी चांगली नोकरी बघुन सेटल हो, घरच्या परिस्थितीला हात भार लाव..पण त्याची जिद्द कायम होती आणि घरचा खूप सपोर्ट होता. म्हणजे आई वडील आणि भावाचा देखील खूप साथ होती.. त्यामुळे त्याला पैशाची कमी कधी भासू दिली नाही.भाऊ साखर कारखान्यात काम करत होता.आणि त्याचे स्वतःचे ग्राहक सेवा केंद्र असल्यामुळे त्याची साथ होती.असच एक दिवस असं काही झालं की तो त्यादिवशी पासून जिद्दीला पेटला .आणि तो कायम मानायचा आपल्या झालेल्या अपमानाचा बदला हा मी यशस्वी होऊनच घेणार .. आणि त्या दिवसापासून त्याने गाव सोडलं आणि तो मनाला जो पर्यंत वर्दी घालत नाही तो पर्यंत गावात येत नाही.२०२५ ची भरती ही याचसाठी शेवटाची ठरली ,ग्राउंड आणि लेखीची तयारी चालू झाली. जवळ जवळ भरती आली, आणि पाहिले पुण्याचे ग्राउंड ५० पैकी ५० मारले आणि लेखी ८५ , आणि त्याच दिवशी तो भरती झाला,आणि एका पाटोपाठ ३ रिझल्ट लागले आणि तो तिन्ही ठिकाणी ओपन (Open) जागेतून भरती झाला .पुणे सिटी पोलिस, मुंबई कारागृह पोलिस ,मुंबई शहर पोलिस.एकाच वेळी तीन ठिकाणी यश त्याचा पदरात पडले.

आणि त्याने दाखून दिलं की पोलिस भरती म्हणजे काय सोपी गोष्ट नाही ,पण केलं तरी काहीच अशक्य नाही , त्यासाठी चिकाटी ,जिद्द आणि सयंम खूप महत्वाचा असतो आणि त्याने शेवटच्या भरतीत ३ पोस्ट एकाच वेळी काढल्या.यामध्ये सगळ्यात मोलाचे मार्गदर्शन म्हणजे त्याचे तयारी करून घेणारे ग्राउंड आणि लेखिची तयारी करून घेणारे शिक्षक होय.अभिषेकच्या  जिद्दीला सलाम .....अभिषेक हा  युवा पिढी साठी व जे भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आदर्श ठरला आहे .

Post a Comment

0 Comments