Type Here to Get Search Results !

पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ पत्रकार व मान्यवरांचा १८ ऑगस्टला सत्कार

पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ पत्रकार व मान्यवरांचा १८ ऑगस्टला सत्कार

कळंब : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न कळंब तालुका मराठी पत्रकार परिषद, ता. कळंब जि. धाराशिव यांच्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ज्येष्ठ पत्रकार व मान्यवरांचा सत्कार समारंभ मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, कळंब येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिवचे पोलीस अधीक्षक ऋतु खोकर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार हेमंत ढोकले, वरिष्ठ क्राईम रिपोर्टर पुणे व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य अक्षय फाटक, पोलीस निरीक्षक शेख शकील, कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रवी नरहिरे, व्यवसायिक संचालक विठ्ठलनाथ (अण्णा) तोडकर, मराठी पत्रकार परिषद धाराशिवचे जिल्हाध्यक्ष रुहीम शेख, गटविकास अधिकारी सोपान अकिले, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टी, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. एम. तळेकर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर व उद्योजक पी. जी. तांबारे तसेच आदर्श मुख्याध्यापक राजेंद्र बाळासाहेब बिक्कड यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार बालाजी आडसुळ, बालाजी निरफळ, धनंजय घोगरे, मुस्तफा मिर्झा, जाफर शेख, तसेच सतिश टोणगे, ज्ञानेश्वर पतंगे, बालासाहेब जाधवर, सुभाष घोडके, डॉ. सुशिल ढेंगळे, विठ्ठल माने आणि उद्योजक गणेश भोसले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

कळंब तालुका मराठी पत्रकार परिषदेतर्फे आयोजित या कार्यक्रमास पत्रकार, विद्यार्थी, पालक, नागरिक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : पंचायत समिती, कळंब, जि. धाराशिव

वेळ : मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६, सकाळी ११ वाजता

आयोजक : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न कळंब तालुका मराठी पत्रकार परिषद

Post a Comment

0 Comments