Type Here to Get Search Results !

रामलिंग देवस्थानकडे जाणारा रस्ता जैसै थे...ग्रामपंचायतचे दुर्लक्ष नागरिकातुन नाराजी

 


रामलिंग देवस्थानकडे जाणारा रस्ता जैसै थे...ग्रामपंचायतचे दुर्लक्ष नागरिकातुन नाराजी

येडशी प्रतिनिधी-महेश पवार

 गावापासून रामलिंग मंदिर परिसरापर्यंतच्या रस्त्यावर यात्रेनिमित्त विविध राजकीय व्यक्ती, व्यावसायिक व इतरांकडून अनेक डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, याच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्याकडे संबंधित प्रशासन व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


रामलिंग देवस्थान पर्यटन क्षेत्र आहे.जिल्ह्यासहीत बाहेर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात.

श्रावण महिन्यात सोमवारी हजारो भाविकांची गर्दी असते.

रामलिंगकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.पावलो पावली खड्डे आहेत.यात्रेच्या आधी रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे होते.श्रावन  महिना सुरू होण्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले होते. मात्र श्रावण महिना सुरू होऊनही रस्त्यावरील खड्डे कायम असल्याने ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, आश्वासनानंतर प्रत्यक्षात कोणती कार्यवाही करण्यात आली?


एकीकडे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असताना दुसरीकडे यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू असल्याने “बॅनरबाजीपेक्षा रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या,” अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि नागरिकांना व भाविकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments