Type Here to Get Search Results !

दहिफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खड्ड्यांचे साम्राज्य वाहनधारक त्रस्त

 

दहिफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खड्ड्यांचे साम्राज्य; पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारक त्रस्त



दहिफळ : प्रतिनिधी

दहिफळ (ता. कळंब) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

चौकातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. परिणामी दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे आणि पाणी यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक हा गावातील वर्दळीचा भाग असल्याने या ठिकाणी दिवसभर वाहनांची मोठी ये-जा असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांतून होत आहे.

संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकातील खड्ड्यांची दुरुस्ती करावी आणि पावसाचे पाणी साचणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments