गर्भवती नर्तिकेचा खून; कला केंद्रातील अंतर्गत वादातून हत्या
पेट्रोल टाकून जंगलात मृतदेह जाळल्याचा आरोप; कळंबच्या चौघांसह सहा जण अटकेत
धाराशिव : समय सारथी कला केंद्रातील अंतर्गत वादातून एका गर्भवती नर्तिकेची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर संबंधित महिलेचा मृतदेह पेट्रोल टाकून जंगलात जाळल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत कळंब येथील चौघांसह एकूण सहा संशयितांना अटक केली आहे. कला केंद्रातील अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, मृत महिलेच्या हत्येमागील नेमके कारण, घटनेतील इतर व्यक्तींचा सहभाग आणि मृतदेह जाळण्यामागील परिस्थिती याबाबत पोलिस तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या प्रकरणातील पुढील तपासानंतर हत्येचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

Post a Comment
0 Comments