Type Here to Get Search Results !

ख्यातनाम वक्ते प्रा प्रदिप सोळुंके यांची शिवसेना पक्षाच्या वक्ता प्रशिक्षण विभागाच्या कक्ष प्रमुख पदी निवड




 ख्यातनाम वक्ते प्रा प्रदिप सोळुंके यांची शिवसेना पक्षाच्या वक्ता प्रशिक्षण विभागाच्या कक्ष प्रमुख पदी निवड

धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा

प्रसिध्द किर्तनकार तथा शिवव्याख्याते लेखक म्हणुन नावलौकीक असलेले प्रा प्रदिप सोळुंके यांनी काही दिवसापुर्वी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.

शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, शिवसेना सचिव श्री संजयजी मोरे यांच्या हस्ते आज प्रा.प्रदीप सोळुंके यांची शिवसेना पक्षाच्या वक्ता प्रशिक्षण विभाग कक्ष प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.

वक्ता प्रशिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात वक्ते तयार करण्याचे कार्य या माध्यमातून होणार आहे.संघटन कौशल्य व प्रभावी वकृत्वामुळे प्रदिप सोळुंके 

राज्यात शिवसेनेची मोठी युवकांची फळी तयार करू शकतात.यामुळे त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिले आहे.निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments