Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायतच्या वतीने कर्तव्यदक्ष महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

 


ग्रामपंचायतच्या वतीने कर्तव्यदक्ष महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

(धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा)

दहिफळ प्रतिनिधी:-(दि१५-८-२०२५)

कळंब तालुक्यातील दहिफळ येथे १५ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचत्य साधून येथील कर्तव्यदक्ष महिला कर्मचारी यांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.

 सन २०२५/२६ करिता ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रजनी राजकुमार मांडवकर (प्राथमिक आरोग्य केंद्र) ,

अनुराधा शांतलिंग बोरके,अर्चना गुणवंत अंगरखे,अर्चना राहुल डांगे (आशा स्वयंसेविक) तसेच पूजा प्रशांत चव्हाण (तलाठी कार्यालय सहाय्यक) यांचा सन्मान तलाठी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील,उपसरपंच अभिनंदन मते,लिपिक गणेश भातलंडे,ग्रामसेवक सुदर्शन मडके,वसंत धोंगडे,शिपाई संतोष उपळकर,अनंत मते उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments