Type Here to Get Search Results !

तृप्ती मुदगल यांची साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड युवा अध्यक्षपदी निवड

 तृप्ती मुदगल यांची साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड युवा अध्यक्षपदी निवड 


धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा

पिंपरी- साहित्य क्षेत्रातील अग्रणी असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शहर युवा अध्यक्ष पदी कवयित्री तृप्ती मुदगल यांची निवड करण्यात आली आहे गेली १० वर्षे त्या साहित्य क्षेत्रात कार्यरत असून विविध साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग नोंदवला आहे अभियंता असलेल्या तृप्ती च्या रूपाने एक उच्च शिक्षित पदवीधर आता पिंपरी चिंचवड शहराचे नेतृत्व करणार आहे त्यांच्या नेतृत्वात शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडणार आहे,युवा पिढीला संघटित करून विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करून समाज सेवा करणार असल्याची भावना यावेळी तृप्ती मुदगल यांनी व्यक्त केली त्यांच्या निवडीचे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी दिले असून त्यांच्या निवडी बद्दल समाजातील सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments