आमदार कैलास पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा
दहिफळ प्रतिनिधी:-
कळंब तालुक्यातील संजितपूर,सापनाई,दहिफळ शिवारातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली
मुसळधार पावसाने याभागातील सोयाबीन पिक पाण्यात गेले आहे.मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तेरणानदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.परंतु इतर भागात ही सोयाबीन पाण्यात आहे.आमदार कैलास पाटील यांनी चिखल तुडवत पिकांची पाहणी केली.
यावेळी तहसीलदार,मंडल अधिकारी,तलाठी उपस्थीत होते.
पिकांचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाईचा अहवाल देण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या.शासनदरबारी आवाज उठवून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देऊ असा शेतकऱ्यांना दिलासा दिला.

Post a Comment
0 Comments