येरमाळ्यात भर पावसात रॅली काढून मुंबईला जाण्याची केली तयारी
धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा
येरमाळा प्रतिनिधी:- मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबईच्या आजाद मैदाणावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे.या आंदोलनाची अंतिम तयार सुरु आहे.२७ ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून लाखोंच्या संख्येने मराठा समाज गाड्या घेऊन प्रस्तान करणार आहे.यासाठी धाराशिव जिल्ह्यातून हजारो गाड्या निघणार आहेत.प्रत्येक गावातून मराठा सेवक मुंबईकडे निघावा यासाठी रॅली काढून चलो मुंबईचा नारा देत बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे.यासाठी येरमाळा येथे रॅली काढून एक मराठा लाख मराठा, आता कुठं जायचं...मुंबईला जायचं
जनजागृती करून येरमाळा येथील विठ्ठल रूक्माई मंदिरात बैठक घेऊन मुंबईला येण्याचे अहवान करण्यात आले आहे. या बैठकी साठी प्रमुख मार्गदर्शक कळंब तालुका समन्वक घनश्याम रितापुरे,मराठा सेवक बलराज रनदिवे,बालाजी भातलवंडे,पांडुरंग मते,बालाजी बारकुल,धनंजय बारकुल, दयानंद बारकुल,दत्तात्रय बारकुल,सुहास बारकुल,अदीसह शेकडो मराठा सेवक उपस्थीत होते.बैठकीत मुंबईला जाण्याचा निर्धार करण्यात आला.

Post a Comment
0 Comments