धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा
दहिफळ प्रतिनिधी:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील आठवडी बाजार प्रत्येक गुरूवारी भरतो.मात्र यावर्षी बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच खांदमळनी दिवशी बाजार भरला.
बाजारात बैल,गायी,म्हशीसाठी लागणारे सर,गोंडे,चंगाळी,रंगरंगोटीसाठी कलर,बेगड,चमकी,कानी,दावं,यांची दुकाणे मांडण्यात आली होती.खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.देशाचा पोशिंदा बळीराजा म्हणजेच शेतकरी होय.शेतकऱ्यांचा खरा आधार म्हणजेच बैल जोडी होय.
काळानुसार यांत्रीकीकरण झाले.शेतातील मशागत पेरणी ट्रॅक्टरने होऊ लागली व बैलजोडी कमी कमी होत गेली.
खिल्लारी सर्जा राजाची जोडी बोटावर मोजण्या इतकी दिसू लागली. हौशी शेतकरी बैलजोडी सांभाळत आहेत.बैलपोळ्या गावातून बैलांची रांगच रांग असायची,अंगावर झुल टाकलेली रंगीबेरंगी बैल बघायला लयभारी वाटायचे.आज बैलपोळा नावालाच राहतो की काय अशी परिस्थीती निर्माण होत आहे.मोजकीच बैलाची जोडी दिसू लागली आहे.गाय म्हैस पशुपालक सांभाळत आहेत.तिच बैलपोळ्याला मिरवली जातात.
ग्रामीण भागात थोड्या का होईना या सनाला महत्व आहे.
बैलपोळ्याचा सन म्हणजे बळीराज्यांच्या लाडक्या सर्जा राजाच्या बैलजोडीचा आनंद उत्सव होय.वर्षभरातून एकदाच बैलांची पुजा केली जाते.यंदा बैलपोळ्याची जय्यत तयारी झाली आहे.आठवडी बाजारात खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती.आपल्या लाडक्या पशुधनाला सजावण्यासाठी.........


Post a Comment
0 Comments