गौर येथील यात्रेची जंग्गी कुस्त्याने सांगता
लखन लंगडेंनी निकाली कुस्ती जिंकली
गौर प्रतिनिधी:-रोहित थोरवे
कळंब तालुक्यातील गौर येथे बैलपोळ्यानिमित्त यात्रा असते.यात्रेनिमित्त गावातून मिरवणुक काढली जाते.
बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच करीदिवशी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नृत्यांगणाचा कार्यक्रम असतो.ट्रॅक्टर मध्ये नृत्यांगणा तालधरून नाचतात.यावेळी गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थीत राहून आनंद घेतात.
मिरवणूक झाल्यानंतर शाळेच्या मैदाणात भव्य कुस्त्याचे आयोजन केले जाते.
कुस्त्यांची परंपरा गेल्या ७० वर्षापासुनची आहे.दोन लाखांच्या कुस्त्या भरवल्या जातात.लहान मल्लापासुन ते मोठ्या मल्लांचा सहभाग असतो.
यंदा खास कुस्त्यांसाठी धाराशिव,लातुर,सोलापूर,बारामती, जिल्हयातील मल्ल सहभागी झाले होते.
कुस्त्यांच्या आखाड्याची पुजा येरमाळा पोलिस स्टेशनचे एपीआय तात्याराव भालेराव यांच्या हस्ते श्रीफळ फोडून केले.यावेळी यात्रा कमीटीचे भाऊसाहेब देशमुख,पंढरीनाथ आसकुळे,हनुमंत माने,दिलीप पाटील,संजय थोरवे,मुकुंद देशमुख,श्याम देशमुख,प्रभाकर लंगडे,लहू कोकाटे,प्रा.अर्जुन माळी,मारूती देशमुख उपस्थीत होते.
अखेरची निकाली कुस्ती १२ हजार ८००शे रूपयांची कुस्ती झाली.सागर लोहार(पोलिस) व गौर येथील लखन लंगडे यांच्या खडी जंग झाली.जवळपास ९ मिनीटाच्या लढतीत लखन लंगडेने डाव मारून सागर लोहारला आस्मान दाखवले. गौर करांची मान गौरवाने उंचवली.लखन लंगडेला खांद्यावर उचलून घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
यात्रा शांतेत पार पाडण्यासाठी यात्राकमिटीने परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments