दहिफळमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ ६ बकरे लंपास ; अज्ञात चोराविरूध्द गुन्हा दाखल
दहिफळ प्रतिनिधी:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील शेतकरी बालाजी विश्वनाथ भातलवंडे यांच्या ६ बकऱ्यांची चोरी झाली आहे.येरमाळा पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की येथील शेतकरी बालाजी विश्वनाथ यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे.गावाजवळच स्वत:च्या शेतात गट नंबर २४४ मध्ये पत्र्याचे शेड आहे.त्यात शेळ्या ७,बकरी १०,पिल्ली ७ एकुण २४ जनावरे होती. दि.२३/८/२०२५ रोजी सायंकाळी १०.३० वाजता चारापाणी करून बालाजी भातलवंडे घराकडे आले.त्याच रात्री मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डाव केला.१० बकऱ्यापैकी मोठ्या ६ बकऱ्यांची चोरी केली.अंदाजे ३५ ते ४० किलो वजनाचे बकरी होती.बाजारभाव १० हजार प्रमाणे ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करत संसाराचा गाडा हकण्यासाठी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणुन शेळी पालनाचा व्यवसाय बालाजी भातलवंडे यांनी सुरू केला होता.मोठे ध्येय उराशी बाळगुन शेळीपालनात वेळ दिला जात होता.ऐन तोंडाशी आलेला खास कुणीतरी हिसकावून घ्यावा असा प्रकार झाला आहे.
अज्ञात चोराविरूध्द फिर्याद बालाजी भातलवंडे यांनी दिली असुन कलम भारतीय न्याय संहिता २०२३ ,३०५(a) , भारतीय न्याय संहिता २०२३, ३३४(१) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास बीट अमलदार मुंढे करत आहेत.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे शेळीपालन करणाऱ्या व्यवसायिकांना धक्का बसला आहे.सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.
Post a Comment
0 Comments