स्वयंसिद्ध शेतकरी उत्पादक कंपनी सभासद व शासकिय अधिकारी यांची संवाद कार्यशाळा उत्साहात संपन्न
दहिफळ प्रतिनिधी-
ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्वयंसिद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपणी आणि शासकिय अधिकारी यांची संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत 250 महिलांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गिताने करन्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करण्यात आले.या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी सरडे साहेब,गट विकास अधिकारी जाधव साहेब, तहसिलदार ढोकले साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, कंपनीच्या कामाचा आढावा आणि कंपनीच्या पुढील काळातील ध्येय धोरणे सुप्रिया पौळ यांनी केले.सरडे सरांनी सेंद्रिय शेती का गरजेची आहे याविषयी माहिती दिली.प्रक्रिया उद्योग उभारुन रोजगार निर्मिती देखिल करु शकतो.भविष्यात गट शेती साठी खुप चांगले भविष्य आहे तसेच गट शेती खुप फायद्याची आहे याविषयी मार्गदर्शन केले.क्रषी विभागातील सर्व योजनांची माहिती दिली.
गट विकास अधिकारी जाधव सरांनी एकात्मिक बाल विकासच्या योजना विषयी माहिती दिली.रोजगार हमी योजना विषयी माहिती दिली.शेततळे,विहिर अशा विविध योजनांची माहिती दिली.मंडळ अधिकारी कदम सरांनी फळबाग लागवड, रेशिम शेती, बांधावरील फळबाग,भाजिपाला रोपवाटिका याविषयी मार्गदर्शन केले.आत्मा विभागातील सावंत सरांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन याविषयी मार्गदर्शन केले.आत्मा विभागाला गट जोडण्याबाबत मार्गदर्शन केले.तहशिलदार ढोकले साहेब यांनी महिलां सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले आणी महिलांनी एकत्रीत येऊन स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे असे सांगितले.महिलांकडे मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गुणांचा संगम आहे महिलांनी ठरवले तर काहिहि करु शकतात असा आत्मविश्वास दिला.पुरवठा विभागातील जयदेवी कांबळे मॅडम यांनी एकत्रित कुटुंब पद्धतीवर मार्गदर्शन केले.महिलांना एकत्रित कुटुंब, व्यवसाय आणि मुलांना संस्कार यांचा ताळमेळ घालून कसे यश संपादन करायचे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन धनश्री निर्फळ,दिपा शिंदे, शुभांगी कदम,मिरा धोंगडे, जयमाला भातलवंडे, सुप्रिया पौळ, अश्विनी शेळके,शितल वाकुरे, दिपाली जाधव,रंजना कदम यांनी परिश्रम घेतले

Post a Comment
0 Comments