नवतरूण गणेश मंडळाची एक गाव एक गणपती परंपरा कायम
___________________________
स्थापना-१९७३ वर्ष५३ वे
(धाराशिव स्टार न्युज सेवा)
दहिफळ प्रतिनिधी-कळंब तालुक्यातील दहिफळ येथील नवतरूण गणेश मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.नवतरूण गणेश मंडळाची स्थापना १९७३ साली झाली होती.एक गाव एक गणपती ही परंपरा कायम ठेवली असुन ५३ वर्ष पुर्ण झाले आहेत.
गणेश उत्सवानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक वर्षी खंडोबा मंदिराच्या जवळ पत्र्याचे शेड उभा करून गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते.१० दिवसाचा हा गणेश उत्सव साजरा करण्यात येतो.
यंदा मंदिरासमोर विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
नवतरूण गणेश मंडळाचे शुभम मते,अमित मते,सुमित मते ,संकेत काकडे जगदीश मते ,सागर मते ,हर्षत मते ,कृष्णा मते अदी मिळून हा गणेश उत्सव साजरा करत आहेत.
Post a Comment
0 Comments