गौर येथे ४० विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप
धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा
गौर प्रतिनिधी-कळंब तालुक्यातील गौर येथील केंद्रीय शाळेत४० विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले आहे.शाळेला गावाचा आधार गावाला शाळेचा अभिमान या उक्तीप्रमाणे नेहमीच शाळेला सहकार्य करणारे एक आदर्श गाव म्हणजे गौर तालुका कळंब जिल्हा धाराशिव. या गावात अनेक थोर हुतात्मे होऊन गेले.. असा ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आणि या गावांमध्ये नोकरी करायची संधी मिळाली. पालकांना एखादी अडचण सांगितली शाळेविषयी तर अशावेळी असंख्य पालक मदतीला धावून येतात त्याचेच एक उदाहरण म्हणजे गौर या ठिकाणी केंद्रीय शाळा आहे या शाळेला जोडून भोसा अवधूतवाडी माळी वस्ती या ठिकाणावरून पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. यातील ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा विद्यार्थी सायकलवरून येतात काही जणांचे पालक गाडीवर आपल्या पाल्याला सोडतात परंतु काही जणांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशांचे पाल्य पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन येतात. अशा विद्यार्थ्यांसाठी शासन स्तरावरून सायकल पुरवण्यात येते परंतु ती अनेक अटी शर्ती मध्ये तसेच राहते. हेच ओळखून सर्व शिक्षकांच्या मनामध्ये एक विचार आला शाळा व लोकसहभाग या दोघांच्या माध्यमातून परगाव वरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण सायकल खरेदी करायची. व परगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी सायकल द्यायची व या शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सदरील सायकल त्या विद्यार्थ्याकडून शाळेत जमा करून घ्यायची व नंतर पाचवीला शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याला ती सायकल द्यायची अशी कल्पना डोक्यात आली. यासाठी 40 सायकली खरेदी करण्याचे नियोजन झाले त्यासाठी अंदाजे दोन लाख रुपये इतका निधी जमा होणे आवश्यक होते त्यासाठीचे आवाहन गौर,भोसा,माळी वस्ती, अवधूतवाडी या ठिकाणच्या पालकांना निधीबाबतचे आवाहन केले आणि त्यास आम्ही शिक्षकांनी पण निधीचा हातभार लावण्याचे ठरवले आणि बघता बघता अडीच लाखाच्या जवळपास निधी दहाच दिवसात जमा झाला. त्यातून सायकली खरेदी केल्या व अशा सायकल बँकेचे उद्घाटन अतिशय थाटामाटा मध्ये व बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. व प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आली. आतापर्यंत दररोज शाळेला चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली. त्यांना सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान वाटलं. अतिशय खुशीमध्ये विद्यार्थी सायकल घेऊन घरी गेली.

Post a Comment
0 Comments