वृध्द महिलेचा जीव वाचवला अजित पिंगळेंनी केला युवकाचा सत्कार
दहिफळ प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील अमोल पांडुरंग भातलवंडे या तरूणाने थाडशी काम केले असुन स्वत:च्या जिवाची परवा न करता तेरणा नदीत एक वृध्द महिला बुडत असल्याचे पाहून नदीच्या पात्रात उडी मारली व त्या ७७ वर्षाच्या आजीला वाचवले.
शिवसेना नेते अजित पिंगळे यांनी दहिफळ येथे येऊन अमोल भातलवंडेंचा सत्कार केला.
दि.१ऑक्टोबर रोजी अमोल भातलवंडे तेरणा नदीच्या पुलावरून सापनाईहुन दहिफळकडे जात असताना एक महिला नदीच्या पात्रात बुडत असल्याची दिसली.एका क्षणाचा विलंब न करता अमोल भातलवंडेने वाहत असलेल्या नदी पात्रात उडी घेतली.
व वृध्द महिलेला वाचवले. ती महिला सापनाई ता. कळंब येथील असल्याचे जमले. नातेवाईक शोध घेत तिथे आले. भागुबाई वाघमारे वय ७७ सुखरूप असल्याचे बघून अमोल भातलवंडे देवदूत म्हणुन आला.नातेवाईकांनी अमोलचे कौतुक केले.ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती.टिव्ही चॅनलवर बातमी प्रसारीत झाली आहे.याची दखल अजित पिंगळे यांनी घेतली. अमोल भातलवंडेंचा
दहिफळ येथील खंडोबा मंदिरात सत्कार करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थीत होते.

Post a Comment
0 Comments