Type Here to Get Search Results !

दहिफळ येथे येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने महिला मेळावा संपन्न

 

दहिफळ येथे येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने महिला मेळावा संपन्न

दहिफळ प्रतिनिधी-

दहिफळ येथील हनुमान मंदिरात येडाई व्यसन मुक्ती केंद्राच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती सप्ताह २०२५ चे आयोजन केले होते.व्यसनमुक्तीचा जनजागृती कार्यक्रम दहिफळ मध्ये घेण्यात आला.

यावेळी प्रियंका शिंदे,(व्यसन मुक्ती केंद्र येरमाळा)विजयश्री वाघमारे (उपसरपंच बाभळगाव)कल्पना कोठावळे,स्वाती भातलवंडे,आश्रुबा नागटिळक,चरणेश्वर पाटील (सरपंच दहिफळ) कष्णा पांचाळ अदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.तसेच कार्यक्रमासाठी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.

उपस्थीत महिलांना मार्गदर्शन प्रियंका शिंदे यांनी केले.

त्या म्हणाल्याकी,व्यसन करणारा व्यक्ती सहज व्यसन करत नाही.त्याच्या मागे अनेक कारणे आहेत.कौटुंबीक ,घरगुती भांडणामुळे टेन्सन,व्यवसायात अपश आल्यामुळे दारूची सवय लागते.हेच व्यसन पुढे संसारात माती कालवते.लेकरा,बाळांचे हाल होऊ लागतात.आयुष्याची बरबादी होते.आपला संसार सुखाचा करायचा असेल तर बायको म्हणून नवऱ्याला समजुन घेतले पाहिजे.संवाद वाढवा,सुख दुख:त दोघांनी सहभागी झाले पाहिजे.प्रेमाने विचारपुस करा.व्यसणात गुंतत चालेल्या व्यक्तीला आधार द्या.समजुन सांगा.दारू सुटत नसेल तर व्यसन मुक्ती केंद्रात दाखल करा.पुन्हा नव्याने जिवन जगण्याची उमेद तयार होईल.येडाई व्यसन मुक्ती केंद्राच्या माध्यमातुन हजारो कुटूंब सुखी जीवन जगत आहेत.आई,बहीण,बायको म्हणून आपण महिलांनी एक पाऊल पुढे होऊन व्यसन मुक्तीच्या लढ्यात सहभागी व्हावे असे अहवान केले.आश्रुबा नागटिळक यांनी स्त्रीयांच्या पराक्रमांचा इतिहास सांगितला.

महिलांनी टिव्ही सिरीयल मध्ये न आडकता. उद्योग व्यवसयात उतरावे.जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातुन लघु उद्योग उभा करता येतात.आपल्या मुलाबाळावर चांगले संस्कार करा.महापुरुषांचे विचार समाजाला दिशा देतात.पुस्तके वाचा.असा मोलाचा संदेश दिला.

विजयश्री वाघमारे यांनी महिलांना कुठलीही अगचण असु द्या मला संपर्क करा.छोटे छोटे उद्योग करा.घरची परिस्थीती बदलायला वेळ लागणार नाही.असे सांगितले.

सुत्रसंचलन स्वाती भातलवंडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments